मराठी व्याकरण : विशेषण व विशेषणाचे प्रकार

               

मराठी व्याकरण : विशेषण व विशेषणाचे प्रकार

                   विशेषण 

विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. विशेषण हा विकारी शब्द आहे. लिंग, वचन, पुरुष यांमुळे त्यात फरक होतो.

उदा. पांढरा-पांढरी-पांढरे; लंगडा-लंगडी-लंगडे इ.

विशेष्य : ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला ‘विशेष्य’ असे म्हणतात.

उदा.चांगला मुलगा .हिरवे रान.

वरील वाक्यातील मुलगा, रान ही विशेष्य होय.

                            विशेषणाचे प्रकार 

१.गुण विशेषण     २.संख्या विशेषण     ३.सार्वनामिक विशेषण

१.गुण विशेषण : १. कडक ऊन पडले आहे.

२. सुंदर फुलांनी बाग बहरली होती.

वरील वाक्यातील कडक, सुंदर हे शब्द विशेषण असून नामाचा विशेष गुण दाखवतात. म्हणून अशा विशेषणांना गुणवाचक विशेषणे असे म्हणतात.

२. संख्यावाचक विशेषण : १. यंदा चार राज्यांच्या निवडणुका होतील.

२. ठाण्यात दहा शिपाई होते.

वरील वाक्यातील चार, दहा ही विशेषणे नामाबद्दल संख्यात्मक माहिती देतात. म्हणून त्यांना संख्यावाचक विशेषणे असे म्हणतात.

३. सार्वनामिक विशेषण: १. माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला. 

२. ते पेन मला आवडले

३. हा माणूस नक्कीच फसवणार.

वरील वाक्यातील कोण, ते, हा हे शब्द विशेषणाचे काम करतात; परंतु मूलतः हे शब्द सर्वनाम आहेत. म्हणून सर्वनामांचा उपयोग जेव्हा विशेषणाप्रमाणे होते तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

विशेषणाचे आणखी काही पोट-प्रकार 

१. निश्चित संख्यावाचक विशेषण : यावरून निश्चित संख्येचा बोध होतो. उदा साठ रोपे. तिनशे पान,

२. अनिश्चित संख्यावाचक विशेषण : यावरून निश्चित संख्येचा बोध होत नाही..

उदा. अनेक नद्या, काही माणसे

३. क्रमवाचक विशेषण : यावरून वस्तूच्या क्रमाचा बोध होतो.

उदा. पहिला मुलगा, लिहावी खोली.

४.परिमाणबोधक विशेषण : यावरून वस्तूच्या परिमाणाचा बोध होतो,

उदा. अर्धवट बातमी, यथेष्ट भोजन.

५.आवृत्तिवाचक विशेषण : यावरून वस्तूची पट समजते. उदा. तिप्पट सामान, दसपट श्रीमंत.

Leave a Comment