अर्थविचार मराठी व्याकरण | arthvichar Marathi Vyakaran

 

अर्थविचार मराठी व्याकरण | arthvichar Marathi Vyakaran

क्रियापदाच्या काही रूपांवरून काळाचा बोध होतो हे आपण पाहिले. क्रियापदाच्या काळाबरोबरच क्रियापदावरून व्यक्त होणारा अर्थसुद्धा महत्त्वाचा आहे. बोलणाऱ्याच्या मनातील भावना त्यातून व्यक्त होत असते. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून विशेषप्रकारच्या भावना व अर्थाचा बोध होतो त्यास अर्थ असे म्हणतात.

१. स्वार्थ २. आज्ञार्थ  ४. संकेतार्थ  ३. विध्यर्थ

१. स्वार्थ :

१. रस्त्यावर गर्दी आहे.

२. त्या भाषणास गर्दी का होऊ नये ? 

येथे सरळ साधे विधान केलेले आहे त्यात विशेष प्रकारचा उद्देश नाही. अशा वेळी स्वार्थ होतो. वरील वाक्ये स्वार्थी वाक्ये आहेत.

२. आज्ञार्थ :

१. शाळेत येऊ नकोस.

२. आम्ही वाचू?

३. जागेवर बसा.

वरील सर्व ठिकाणी आज्ञा दिली आहे किंवा मागितली आहे. जेव्हा क्रियापदांच्या रूपावरून आज्ञा, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद असा अर्थ निघतो तेव्हा तो आज्ञार्थ म्हणावा.

३. विध्यर्थ :

१. सांगितलेले नीट ऐकून घ्यावे.

२. खूप कष्ट करावे अन् पैसा मिळवावा.

३. आज एवढी कविता संपावी. येथे आज्ञा नाही, तर कर्तव्य, इच्छा व्यक्त होत आहे. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, रीत, योग्यता या अर्थाचा बोध होतो तेव्हा त्यास विध्यर्थ म्हणतात. विधी म्हणजे कर्तव्य.

४. संकेतार्थ :

१. जर गारा पडल्या असत्या तर बरे झाले असते. २. अभ्यास केला असता तर नंबर आला असता.

३. डॉक्टर आले असते तर तो वाचला असता.

येथील क्रियापदाच्या रूपांवरून आज्ञा किंवा कर्तव्य अशा अर्थाचा बोध होत नसून अमुक केले तर तमुक होईल असा संकेताचा अर्थ व्यक्त होतो, तेव्हा त्यास संकेतार्थ म्हणतात.

Leave a Comment