विकारी शब्दांचा अभ्यास करताना आपण असे पाहिले की शब्दांमध्ये लिंग, वचन, पुरुष यांच्यामुळे फरक पडतो. त्यापैकी येथे लिंगाबद्दल विचार करू या. पुढील वाक्ये पाहा :
१. सर्कसमध्ये वाघ डरकाळ्या फोडत होता.
२. बागेतील सुंदर फूल कोणी तोडले ?
३. इंग्लंडचा जाहिरनामा राणीने जाहीर केला.
४. अरबी घोड़ा देखणा असतो.
५. पारिजातकाचे झाड चांगले डवरले होते.
येथील ठळक अक्षरांतील शब्दांकडे बारकाईने पाहा. वाघ, घोडा या शब्दांनी पुरुष जातीचा बोध होतो. सर्कस, राणी या शब्दांवरून स्त्रीजातीचा बोध होतो आणि फूल
झाड या शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री जातीचा नक्की बोध होत नाही. वस्तूच्या पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला लिंग असे म्हणतात.
लिंगे एकूण तीन आहेत.
१. पुंलिंग २. स्त्रीलिंग ३. नपुंसकलिंग
१. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुंलिंग असे म्हणतात.
उदा.
माणूस, भाला, बैल, शंकर, पर्वत, दगड, कोनाडा, रस्ता, चौरंग इ. २. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. उदा. स्त्री, गाय, शाई, वही, दोरी, टेकडी, चिमणी, माती, पाटी, गंगा, काकडी, विभावरी इ.
३. ज्या नामावरून पुरुषजात किंवा स्त्रीजात स्पष्ट होत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात. उदा. मूल, मांजर, फूल, पुस्तक, पिल्लू, सोने, अंगण, वासरू, झाड, जनावर, घर, टेवल, जाकीट, मस्तक इ.
सजीव प्राण्यांत स्त्री, पुरुष असा बोध सहज होतो पण निर्जीव पदार्थात तो भेद कल्पनेने मानला जातो. भाषेतील शब्दांचे लिंग ठरविण्याचे विशिष्ट नियम नसतात. सर्वसाधारणपणे लिंग ठरवताना जोर, कठीणपणा, शक्ती, ताकद वगैरे गुण पाहून
पुंलिंग म्हटले जाते. नाजुकपणा, सुंदरता, कोमलता यांसारखे गुण पाहून स्त्रीलिंग म्हटले जाते. क्षुद्रत्व, लघुत्व, तिरस्करणीयत्व यांसारखे गुण पाहून नपुंसकलिंग म्हटले जाते. लिंग ओळखण्याची सोपी खूण
(अ) ज्या शब्दामागे तो हे सर्वनाम लावता येईल तो शब्द पुंलिंगी होय.
(ब) ज्या शब्दामागे ती हे सर्वनाम लावता येईल तो शब्द स्त्रीलिंगी होय.
(क) ज्या शब्दामागे ते हे सर्वनाम लावता येईल तो शब्द नपुंसकलिंगी होय.
लिंग बदल करण्याचे काही नियम
१. ई प्रत्यय लावून दास-दासी, गोप-गोपी, देव-देवी इ.
२. आ प्रत्यय लावून: बाल-बाला, प्रिय-प्रिया, कोकिळ-कोकिळा इ.
३. ईण प्रत्यय लावून : सिंह-सिंहीण, कोळी-कोळीण, गुरव गुरवीण इ.
४. अक प्रत्ययांत शब्दांतील अ ऐवजी इ करून नायक-नायिका, बालक बालिका इ.
५. काही वेगळी रूपे : पुरुष-स्त्री, बैल गाय, पिता-माता, नर-नारी, दीर जाऊ, राजा-राणी इ.