लिंगामुळे शब्दात कोणता फरक पडतो हे पाहिल्यानंतर वचनामुळे कोणता फरक पडतो हे पाहू.
पुढील वाक्ये पाहा :
१. दुपारी ते घर लुटले गेले..
२. सरकारने नवीन घरे बांधण्यास परवानगी दिली.
३. शहरातील ही टोलेजंग इमारत आहे.
४. पावसामुळे खूप इमारतींचे नुकसान झाले.
५. मी पहिला नंबर सोडणार नाही.
६. आम्ही परीक्षेत मानकरी ठरलो.
येथील घर, इमारती, मी या शब्दांवरून फक्त एक या संख्येचा बोध होतो, तर घरे, इमारती, आम्ही या शब्दांवरून एक सोडून अधिक संख्येचा बोध होतो. वस्तूच्या रूपावरून किती संख्या याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात. बचने दोन आहेत.
१. एकवचन : जेव्हा शब्दावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा ते एकवचन होय.
२. अनेकवचन : जेव्हा शब्दावरून एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते अनेकवचन किंवा बहुवचन होय.
वचन बदलाचे काही नियम
पुंलिंगी शब्द
१. अकारांत शब्दांचे अनेकवचन तेच राहते देव-देव, सिंह सिंह, ढगढग, खांब खांब.
२. इ व ई कारांत शब्दांचे अनेकवचन तेच राहते : अग्नी अग्नी, कवी-कवी, तेली- तेली.
३. उ व ऊ कारांत शब्दांचे अनेकवचन तेच राहते: शत्रू शत्रू, गुरू-गुरू, हेतू – हेतू.
४. ओ कारांत शब्दांचे अनेकवचन तेच राहते: टाहो टाहो, खोखो-खोखो,
५. आकारांत शब्दांचे अनेकवचन ए प्रत्यय लावून : घोडा घोडे, राजा-राजे, आंबा-आंबे, दिवा-दिवे, शहाणा शहाणे. स्त्रीलिंगी शब्द
१. आ प्रत्यय लावून सून-सुना, लवंग-लवंगा, वीट-विटा.
२. ई प्रत्यय लावून भिंत-भिंती, परात-पराती, चाळण चाळणी