वाक्याचे प्रकार मराठी व्याकरण | Vakyache prakar Marathi Vyakaran

 

वाक्याचे प्रकार मराठी व्याकरण | Vakyache prakar Marathi Vyakaran

आपण वाक्य म्हणजे काय हे पूर्वी पाहिले. आपण व्यवहारात नेहमी बोलत अथवा लिहीत असतो तेव्हा एकाच प्रकारच्या वाक्याचा उपयोग करीत नाही. वाक्याच्या रचनेवरून व वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे काही निरनिराळे प्रकार पडतात. त्यासंबंधी येथे थोडक्यात विचार करू.

बोलताना अथवा लिहिताना आपण कधी प्रश्न करतो, कधी आज्ञा करतो, कधी आपल्या भावना व्यक्त करतो, कधी नकार दर्शवितो. यावरून बोलणाऱ्या अथवा लिहिणाऱ्याच्या अर्थावरून वाक्याचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात.

अर्थदृष्ट्या वाक्याचे प्रकार

१. विधानार्थक वाक्य : 

खालील वाक्ये पाहा.

१. देवळापाशी एक भिकारी झोपला आहे. २. नद्यांना प्रचंड पूर आला

येथील वाक्यांत प्रत्येकी एक सरळ अर्थाने विधान केलेले आहे म्हणून ज्या वाक्यात एक सरळ विधान केलेले असते त्याला विधानार्थक वाक्य असे म्हणता

२. नकारार्थी वाक्य : 

१. तुझे वागणे अलीकडे चांगले नाही. 

२. कष्टाशिवाय यश मिळत ना

येथील वाक्यांतून नकारात्मक अर्थ प्रकट होतो. म्हणून ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो त्याला नकारार्थक वाक्य असे म्हणता

३. आज्ञार्थक वाक्य : 

१. त्याला हे चित्र दाख

२. रस्त्याच्या पलीकडून जा

येथील वाक्यांतून आज्ञा दिसून येते. ज्या वाक्यातून आज्ञा प्रकट होते. त्यास आज्ञार्थ वाक्य असे म्हणतात.

४. प्रश्नार्थक वाक्य :

१. मग त्याने कोणते काम करावे ? 

२. तुम्ही तारे मोजू शकाल काय ?

येथील वाक्यांतून प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणून ज्या वाक्यातून प्रश्नाचा बोध तिने होतो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात.

५. उद्गारार्थी वाक्य

१. छान ! तुम्हालाच शोभते हे ! 

२. अरेरे! काय तुझी ही दशा !

येथील वाक्यातून तिरस्कार, दुःख अशा भावना उद्गारातून व्यक्त झाल्या आहेत. ज्या वाक्याद्वारे आपल्या मनातील हर्ष, खेद अशा प्रकारच्या भावना प्रकट होतात याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

६. इच्छार्थक वाक्य :

१. असे करतेवेळी मन घट्ट करावे. २. अगोदर छोट्यांना आत जाऊ द्यावे.

येथील वाक्यांतून सांगणाऱ्याची इच्छा स्पष्ट होते. ज्या वाक्यातून इच्छा दर्शविली जाते त्यास इच्छार्थक वाक्य असे म्हणतात.

रचनेच्या दृष्टीने वाक्याचे प्रकार

वरील प्रकार हे बोलणाऱ्याच्या अर्थावरून पडलेले आहेत. वाक्याचे उद्देश आणि विधेय असे दोन भाग असतात हे आपण पूर्वी पाहिले. वाक्याच्या या रचनेवरून वाक्याचे। पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.
९. केवल वाक्य :
१. आम्हाला प्रसाद मिळाला.
२. गुणवानांचा नेहमी गौरव होतो..
३. आज पाऊस पडावा.
येथील वाक्यात एकच उद्देश व एकच क्रियापद आहे. म्हणून ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच क्रियापद असते त्यास केवल किंवा साधे वाक्य असे म्हणतात. २. मिश्र वाक्य : खालील वाक्ये पाहा.
१. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा जेवणे झाली होती हे कळले. २. एवढे एक गणित सोडवून टाकले की अभ्यास संपेल.
३. पाऊस पडावा म्हणून शेतकरी वाट पाहत होते.
४. जो देशसेवा करतो तोच खरा देशभक्त.
वरील वाक्ये जरा बारकाईने पाहा. त्यामध्ये दोन दोन वाक्ये आढळतील. ती वाक्ये एकमेकांशी जोडली गेली आहेत.
आता त्यातील एक वाक्य पाहू या.
१. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा
२. एवढे एक गणित सोडवून टाकले की
३. पाऊस पडावा म्हणून
४. जो देशसेवा करतो तोच येथील वाक्यात कर्ता आहे, क्रियापद आहे. परंतु तरी सुद्धा त्यातील अर्थ पूर्ण आहे।
असे वाटते काय ?
पुन्हा विचार करू या.
१. जेवणे झाली ते केव्हा कळले ? २. अभ्यास केव्हा संपेल ?
३. शेतकरी कोणती वाट पाहत होते ? ४. खरा देशभक्त कोण ?
या प्रश्नांची उत्तरे म्हणून वरील अर्धी वाक्ये आलेली दिसतात. ही अर्धी वाक्ये पुढील
वाक्यातील मुख्य अर्थाचा विस्तार करतात. म्हणजे येथे एक मुख्य वाक्य व गौण वाक्य आहे. कधी कधी गौण वाक्ये जास्त असू शकतात. अशा रीतीने जेव्हा वाक्यात एक मुख्य (प्रधान) वाक्य असून त्यावर अवलंबून असणारी गौण वाक्ये असतात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
मिश्र वाक्यातील प्रधान वाक्य आरंभी अथवा शेवटी केव्हाही येऊ शकते. मिश्र वाक्यातील गौण वाक्ये कारण-की, म्हणजे म्हणून, जो-तो, जेव्हा-तेव्हा, जेथे तेथे अशा क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेली असतात.
३. संयुक्त वाक्य :
१. तू पळत जा आणि हा निरोप दे.
२. वारा सुटला आणि पाऊस गेला.
३. तू खेळ पण अभ्यास करत जा. येथेसुद्धा दोन दोन वाक्ये दिसतात. पण त्या प्रत्येकातील विधान स्वतंत्र आहे. कोणतेही विधान कोणावरही अवलंबून नाही. वरील जोड वाक्ये आणि, पण या अव्ययांनी जोडलेली आहेत. अशा रीतीने जेव्हा एका वाक्यात एकापेक्षा अधिक वाक्ये येतात आणि त्यातील प्रत्येक विधान स्वतंत्र व मुख्य असते, कोणावरही अवलंबून नसते तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
संयुक्त वाक्यातील जोडवाक्ये आणि, व, पण, किंवा यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

वाक्याचे प्रकार (ब)

वर आपण वाक्याचे प्रकार पाहिले. त्यातील मिश्रवाक्याचा विचार करताना प्रधान वाक्य व गौण वाक्य यांबद्दल आपण संक्षेपाने विचार केला होता. या ठिकाणी गौण वाक्यांचा बारकाईने विचार करू या.
१. नाम वाक्य- पुढील वाक्ये पाहा.
(अ) सरदाराने ही गोष्ट राजाला सांगितली.
शत्रुसैन्याने आक्रमण केले आहे असे सरदाराने राजास सांगितले.
(ब) अध्यापकांनी शिपायांची तक्रार मुख्याध्यापकास सांगितली.
शिपाई नीट काम करीत नाही असे अध्यापकांनी मुख्याध्यापकास सांगितले.
येथील पहिल्या भागातील वाक्ये केवलवाक्ये आहेत. त्यामध्ये अनुक्रमे गोष्ट व तक्रार हे शब्द कर्म आहेत. दुसऱ्या विभागातील वाक्ये मिश्र वाक्ये आहेत. पहिल्या वाक्यातील गोष्ट या शब्दाबद्दल “शत्रुसैन्याने आक्रमण केले आहे” असे पोटवाक्य आलेले आहे. तसेच
तक्रार या शब्दाबद्दल “शिपाई नीट काम करीत नाही” असे पोटवाक्य आलेले आहे. म्हणजे जेव्हा केवल वाक्यात कर्ता, कर्म यांबद्दल नामाचा उपयोग केला जातो तेथे मिश्रवाक्यात त्या नामाऐवजी एक पोटवाक्य येते. म्हणून मिश्रवाक्यात नामाप्रमाणे उपयोग होणाऱ्या गौण वाक्यास नामवाक्य असे म्हणतात.
मिश्रवाक्यात गौणवाक्य हे मुख्य वाक्यातील एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण करते. है संपूर्ण गौणवाक्य कर्ता किंवा कर्म म्हणून काम करते.
२. विशेषण वाक्य
(अ) कष्टाळू माणूस यश मिळवितो.
जो माणूस भरपूर कष्ट करतो तो यश मिळवतो.
(ब) हुशार विद्यार्थ्याचे कौतुक होते.
जो विद्यार्थी हुशार असतो त्याचे कौतुक होते.
पहिल्या विभागात कष्टाळू, हुशार, हे शब्द विशेषणे आहेत हे सहज समजेल. या विशेषणाच्या ऐवजी दुसऱ्या विभागात अनुक्रमे “जो माणूस भरपूर कष्ट करतो” आणि जो विद्यार्थी हुशार असतो अशी पोटवाक्ये आलेली आहेत. दुसऱ्या विभागातील वाक्ये मिश्र वाक्ये आहेत.
मिश्रवाक्यात जे गौणवाक्य विशेषणाप्रमाणे कार्य करते त्यास विशेषणवाक्य असे म्हणतात.
३. क्रियाविशेषण वाक्य
१. जेव्हा शिटी वाजली तेव्हा सर्वांनी तिकडे बघितले. २. जेथे मी बसलो होतो तेथे भिंत पडली.
येथील “जेव्हा शिटी वाजली”, “जेथे मी बसलो होतो” ही गौणवाक्ये आहेत. जेव्हा शिटी वाजली हे गौणवाक्य प्रधान वाक्यातील क्रियेची वेळ दाखवते, केव्हा बघितले ? जेव्हा शिटी वाजली तेव्हा. भिंत कोठे पडली ? जेथे मी बसलो होतो तेथे. है गौणवाक्य प्रधान वाक्यातील क्रियेच्या स्थळाचा बोध करून देते. क्रियापदाच्याबद्दल विशेष माहिती देणारा शब्द तो क्रियाविशेषण होय. या ठिकाणची गौण वाक्ये ही प्रधान वाक्याच्या क्रियाविशेषणासारखी कामे करतात.
मिश्रवाक्यात जे गौणवाक्य क्रियाविशेषणाप्रमाणे कार्य करते त्यास क्रियाविशेषण वाक्य असे म्हणतात. थोडक्यात वाक्यप्रकार पुढीलप्रमाणे :
अर्थावरून :
१. विधानार्थी वाक्य – केवळ सरळ विधान.
२. होकारार्थी वाक्य – फक्त होकार स्पष्ट होणे.
३. नकारार्थी वाक्य – फक्त नकार स्पष्ट होणे.
४. आज्ञार्थक वाक्य- आज्ञेचा बोध होणे.
५. प्रश्नार्थक वाक्य – प्रश्नाचा बोध होणे. 
६. इच्छार्थक वाक्य – इच्छा समजणे.
७. उद्गारार्थी वाक्य – भावनांचा बोध होणे.
रचनेवरून : 
१. केवल वाक्य – एकच उद्देश्य, एकच विधेय.
२. मिश्र वाक्य – अधिक उद्देश्य, अधिक विधेय, एक वाक्य मुख, दुसरी त्यावर अवलंबून असणारी गौणवाक्ये.
३. संयुक्त वाक्य – अनेक वाक्ये परंतु सर्व स्वतंत्र.

Leave a Comment