वाक्याचे भाग : उद्देश्य व विधेय मराठी व्याकरण | Vakyache bhag Marathi Vyakaran

वाक्याचे भाग : उद्देश्य व विधेय मराठी व्याकरण | Vakyache bhag Marathi Vyakaran

 वाक्य म्हणजे काय याचा विचार केल्यानंतर आता वाक्याच्या प्रमुख भागाचा विचार करू. वाक्यात कमीत कमी दोन शब्द असतातच. त्याहीपेक्षा भरपूर शब्द असू शकतात. असे असूनदेखील वाक्याचे दोनच भाग असतात.

पुढील वाक्ये पाहा :

१. दिवस उगवला.

२. शिपायाने घंटा वाजवली.

३. जपान एक संपन्न देश बनला आहे.

४. विभावरी घरी लवकर येईल.

५. आमच्या संघाने स्पर्धा जिंकली.

या वरील वाक्यांत दिवस, शिपाई, जपान, विभावरी, आमचा संघ यांच्याबद्दल काही सांगितले आहे. दिवस यास उद्देशून उगवला असे सांगितले आहे. शिपाई यास उद्देशून घंटा वाजवली असे सांगितले आहे. जपान यास उद्देशून एक संपन्न देश बनला आहे असे सांगितले आहे.

प्रत्येक वाक्यात कशाला तरी उद्देशून सांगितलेले आहे. वाक्याचा हा एक भाग म्हणता

येईल. म्हणून वाक्यात ज्याच्याबद्दल उद्देशून आपण बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात.

वरील वाक्यात दिवस, शिपाई, जपान, विभावरी, आमचा संघ ही उद्देश्य होत. या उद्देश्यांबद्दल क्रमश: पुढे काहीतरी विधान केले गेलेले आहे. हा वाक्याचा दुसरा भाग म्हणता येईल. म्हणून उद्देश्याबद्दल जे विधान केलेले असते त्यास विधेय असे म्हणतात.

हे वर्गीकरण असे करता येईल.

उद्देश्य विधेय
दिवस उगवला.
शिपायाने घंटा वाजवली.
जपान एक संपन्न देश बनला आहे.
विभावरी घरी लवकर येईल.

Leave a Comment