पुढील वाक्ये पाहा :
१. मुलाला शिक्षा का केली.
२. वाघास ठार मारले.
३. वारकऱ्यांना जाण्यास उशीर झाला.
येथील मुलाला, वाघास, वारकऱ्यांना या शब्दांकडे पाहिल्यावर असे दिसेल की मूल, वाघ, वारकरी हे मूळ शब्द आहेत, पण त्या शब्दांच्या शेवटी काही फरक झालेला आहे. या शब्दांना ला, स, ना हे विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत. ते प्रत्यय लागताना मूळ शब्दांच्या शेवटी फरक झालेला आहे. मूल-मुलाला वाघ वाघास, वारकरी वारकऱ्यांना. जेव्हा शब्दास विभक्ती प्रत्यय लावताना त्या शब्दाच्या स्वरूपात फरक पडतो तेव्हा त्यास सामान्यरूप असे म्हणतात.
सामान्यरूप करण्याचे नियम
१. अ कारांताचे आ कारांत होणे : वाघ वाघास, घर-घराहून, सुतार-सुताराने.
२. या कारांत होणे : घोडा घोड्यास, चुलता-चुलत्याने, सरडा सरड्यापाशी, पुजारी- पुजाऱ्यांचा.
३. ई कारांत होणे : भिंत भिंतीस, देवी-देवीने, हत्ती – हत्तीचा.
४. वा कारांत होणे : भाऊ-भावाचा, लाडू-लाडवाचा, नातू-नातवाने.
५. य बद्दल ई होऊन गाय गाईस, सोय- सोईने.
६. ए कारांत होणे : सून-सुनेने, गूंज-गुंजेस, माता-मातेला.