वाक्याचे प्रकार मराठी व्याकरण | Vakyache prakar Marathi Vyakaran

  आपण वाक्य म्हणजे काय हे पूर्वी पाहिले. आपण व्यवहारात नेहमी बोलत अथवा लिहीत असतो तेव्हा एकाच प्रकारच्या वाक्याचा उपयोग करीत नाही. वाक्याच्या रचनेवरून व वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे काही निरनिराळे प्रकार पडतात. त्यासंबंधी येथे थोडक्यात विचार करू. बोलताना अथवा लिहिताना आपण कधी प्रश्न करतो, कधी आज्ञा करतो, कधी आपल्या भावना व्यक्त करतो, कधी नकार दर्शवितो. … Read more

अर्थविचार मराठी व्याकरण | arthvichar Marathi Vyakaran

  क्रियापदाच्या काही रूपांवरून काळाचा बोध होतो हे आपण पाहिले. क्रियापदाच्या काळाबरोबरच क्रियापदावरून व्यक्त होणारा अर्थसुद्धा महत्त्वाचा आहे. बोलणाऱ्याच्या मनातील भावना त्यातून व्यक्त होत असते. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून विशेषप्रकारच्या भावना व अर्थाचा बोध होतो त्यास अर्थ असे म्हणतात. १. स्वार्थ २. आज्ञार्थ  ४. संकेतार्थ  ३. विध्यर्थ १. स्वार्थ : १. रस्त्यावर गर्दी आहे. २. त्या … Read more

सामान्यरूप मराठी व्याकरण | samanya rup Marathi Vyakaran

  पुढील वाक्ये पाहा : १. मुलाला शिक्षा का केली. २. वाघास ठार मारले.  ३. वारकऱ्यांना जाण्यास उशीर झाला. येथील मुलाला, वाघास, वारकऱ्यांना या शब्दांकडे पाहिल्यावर असे दिसेल की मूल, वाघ, वारकरी हे मूळ शब्द आहेत, पण त्या शब्दांच्या शेवटी काही फरक झालेला आहे. या शब्दांना ला, स, ना हे विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत. ते … Read more

वचन विचार मराठी व्याकरण | Vachan vichar Marathi Vyakaran

  लिंगामुळे शब्दात कोणता फरक पडतो हे पाहिल्यानंतर वचनामुळे कोणता फरक पडतो हे पाहू. पुढील वाक्ये पाहा : १. दुपारी ते घर लुटले गेले.. २. सरकारने नवीन घरे बांधण्यास परवानगी दिली. ३. शहरातील ही टोलेजंग इमारत आहे. ४. पावसामुळे खूप इमारतींचे नुकसान झाले. ५. मी पहिला नंबर सोडणार नाही. ६. आम्ही परीक्षेत मानकरी ठरलो. येथील … Read more

लिंगविचार मराठी व्याकरण | Ling vichar Marathi Vyakaran

  विकारी शब्दांचा अभ्यास करताना आपण असे पाहिले की शब्दांमध्ये लिंग, वचन, पुरुष यांच्यामुळे फरक पडतो. त्यापैकी येथे लिंगाबद्दल विचार करू या. पुढील वाक्ये पाहा :  १. सर्कसमध्ये वाघ डरकाळ्या फोडत होता. २. बागेतील सुंदर फूल कोणी तोडले ? ३. इंग्लंडचा जाहिरनामा राणीने जाहीर केला.  ४. अरबी घोड़ा देखणा असतो. ५. पारिजातकाचे झाड चांगले डवरले … Read more

सर्वनाम विचार मराठी व्याकरण | sarvanam vichar Marathi Vyakaran

  पुढील परिच्छेद वाचा : शैलेंद्राला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शैलेंद्राने येथे आपला अभ्यास वेळेवर सुरू केला. शैलेंद्राला परीक्षेत चांगले गुण मिळाले. कॉलेजमधील विविध स्पर्धांत शैलेंद्राने भाग घेऊन खूप बक्षिसे मिळवली. शैलेंद्राच्या कामात काही मित्र पण मदत करतात. आता हा परिच्छेद वाचा. शैलेंद्राला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याने तेथे आपला अभ्यास वेळेवर सुरू केला. त्याला परीक्षेत चांगले … Read more

नाम विचार मराठी व्याकरण | naam vichar Marathi Vyakaran

  खालील वाक्ये पाहा : १. विभावरी खेळावयास गेली आहे. २. लहान मुलांना खेळणी आवडतात. ३. काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. ४. कधीही लबाडी करू नये. ५. हवा फार सुंदर पडली आहे. ६. व्रात्यपणा सोडलास तर काय होईल ?  ७. गोविंदाला आंधळेपण आले आहे. या वाक्यांतील विभावरी, मुलांना, काश्मीरचे सौंदर्य, लबाडी, हवा, व्रात्यपणा, गोविंद, आंधळेपण हे … Read more

शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | shabdanchaya Marathi Vyakaran

  आपण पाहिले की वाक्यामध्ये अनेक सार्थ शब्द असतात. शब्द अनेक असतात असे म्हटल्यावर त्यांचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे ठरते. त्याचा येथे विचार करू या. खालील वाक्ये पाहा : १. मी गावाला गेलो. २. पंतप्रधानांनी शहरांना भेटी दिल्या. ३.आम्ही चांगली पुस्तके विकत घेतली.  ४. त्याने चांगले पुस्तक भेट दिले. येथील जाड टाईपमधील शब्दांकडे जर बारकाईने पाहिले … Read more

वाक्याचे भाग : उद्देश्य व विधेय मराठी व्याकरण | Vakyache bhag Marathi Vyakaran

 वाक्य म्हणजे काय याचा विचार केल्यानंतर आता वाक्याच्या प्रमुख भागाचा विचार करू. वाक्यात कमीत कमी दोन शब्द असतातच. त्याहीपेक्षा भरपूर शब्द असू शकतात. असे असूनदेखील वाक्याचे दोनच भाग असतात. पुढील वाक्ये पाहा : १. दिवस उगवला. २. शिपायाने घंटा वाजवली. ३. जपान एक संपन्न देश बनला आहे. ४. विभावरी घरी लवकर येईल. ५. आमच्या संघाने … Read more

वाक्यविचार मराठी व्याकरण | Vakyavichar Marathi Vyakaran

पुढील वर्णन वाचा : “माझ्या गावाचे नाव कोल्हापूर आहे. त्याला कोणी करवीर नगरी असेही म्हणतात. करवीर हे एक तीर्थक्षेत्र आहे. येथे महालक्ष्मी देवीचे प्रसिद्ध देवालय आहे. देवीच्या दर्शनासाठी नेहमी लोक गर्दी करतात. महालक्ष्मीच्या मंदिराशिवाय पन्हाळा, विशाळगड ही , ऐतिहासिक स्थाने येथून जवळच आहेत. ” येथे एका गावाबद्दल काही सांगितले आहे. यावरून असे लक्षात येईल की, … Read more